1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 एप्रिल 2020 (22:26 IST)

मंत्रालयात कोरोना, निर्जंतुकीकरणासाठी कामकाज बंद

Corona in the ministry
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि त्यासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांचे निर्जंतुकीकरणासाठी  २९ आणि ३० एप्रिल रोजी मंत्रालयातील कामकाज बंद राहणार असल्याची अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली. कोरोनामुळे महामारीची परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार मंत्रालय आणि नविन प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयांचे निर्जंतुकीकरणाचे काम बुधवार, गुरुवारी होणार आहे.
 
मंत्रालयातील सफाई कर्मचाऱ्यासह चार जणांचा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाबाधित सफाई कर्मचाऱ्यामुळे तिघांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.