रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 जुलै 2021 (08:05 IST)

वारीला सुरुवात होत असतानाच कोरोनाचा शिरकाव

आषाढी वारीसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. यातच वारीला सुरुवात होत असतानाच कोरोनाचा शिरकाव झाला आहे. माऊलीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी निवडण्यात आलेल्या 100 वारकऱ्यांपैकी 2 जणांना कोरोनाची लागण झाली. तर दर्शनासाठी आलेल्या लोकांपैकी 20 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 
 
सोबतच 50 लोकांना माऊलीच्या दर्शनासाठी परवानगी टप्प्या टप्प्यानं देण्यात आली होती. त्यानंतर कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 164 जणांचे रिपोर्ट आले असून 20 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 
 
विठुरायाच्या भेटीसाठी तुकोबारायांचा पालखी प्रस्थान सोहळा सुरू झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रस्थान सोहळ्यासाठी केवळ मोजक्याच वारक-यांनाच परवानगी देण्यात आली आहे.