testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

किरकोळ कारणावरुन थेरगावात तरुणावर कोयत्याने वार

पिंपरी| Last Modified बुधवार, 11 ऑक्टोबर 2017 (09:49 IST)
किरकोळ कारणावरुन तरुणावर कोयत्याने वार करुन जखमी केल्यानंतर आरडाओरडा करुन दहशत माजविणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी (दि. 9) पहाटे सव्वा दोनच्या सुमारास थेरगावमधील ड्रायव्हर कॉलनीत घडली.
प्रशांत पवार (वय 25, रा. थेरगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चंद्रकांत शंकर गुंजाळ (वय 30) आणि कुमार उर्फ राजु हनुमंत गुंजाळ (वय 26, रा. दोघेही रा. ड्रायव्हर कॉलनी, थेरगाव) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. फिर्यादी प्रशांत हे त्यांचा भाऊ सूरज याच्या घरी गप्पा मारत होता.

यावेळी किरकोळ कारणाचा मनात राग धरुन हे दोघेजण त्याठिकाणी कोयता घेऊन आले. त्यांनी प्रशांतवर कोयत्याने वार करुन जखमी केले. त्यानंतर यापरिसरात आरडाओरड करुन दहशत निर्माण केली. याप्रकरणी दोघांना अटक केली असून, वाकड पोलीस तपास करत आहेत.


यावर अधिक वाचा :