मंगळवार, 19 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017 (17:18 IST)

खर्डीत आढळली मगर

कोकण अर्थात चिपळूण येथील  खेर्डी येथील विनोद भुरण यांच्या कातळवाडी येथील साचलेल्या पाण्यामध्ये मगर आढळली आढळून आली आहे. मगर आहे हे दिसताच त्यांनी  माहिती वनविभागाला दिली होती. तेव्हा वनविभागाने २ तास प्रयत्न करत ही जिवंत मगर पकडली आहे. विशेष म्हणजे ही  ही मगर मादी जातीची होती तिचे वय १ वर्ष तर लांबी १२५ सेमी. होती.विभागाचे वनरक्षक रामदास खोत, डी. आर. सुर्वे, सुजित मोरे, संदेश पाटेकर यांनी क्वारीतील पाणी पंपाच्या सहाय्याने पाणी बाहेर काढले व दगडात असलेल्या मगरीला सुरक्षित बाहेर काढले आहे. या परिसरात समुद्र आणि नद्या एकत्र येतात त्यामुळे समुद्रातून किंवा वाहत अनेक मगरी या परिसरात येत असतात. ही मगर मात्र शेतातील साचलेल्या तलावत आढळली होती त्यामुळे परिसरात भीती निर्माण झाली होती. कोणताही अनर्थ घडू नये म्हणून वन विभागाने कारवाई केली आहे. या मगरीला वाहत्या पाण्यात सोडून देण्यात येणार आहे.