शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 जुलै 2018 (16:11 IST)

वारीमध्ये साप सोडून चेंगराचेंगरी घडवून आणण्याचा कट – मुख्यमंत्री

पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीमध्ये साप सोडून चेंगराचेंगरी घडवून आणण्याचा कट रचणार्‍यांमध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश असून, त्यांचे संभाषण आमच्या हाती लागले असून, या नेत्यांवर सरकारने कारवाई सुरू केली आहे, असा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे सापाचा विषय अजून चिघळला आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारीमध्ये साप सोडून चेंगराचेंगरी घडवून आणण्याचा कट रचला असल्याचा आरोप केला होता. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती खरी असल्याचे सांगितले. 
 
पाटील यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांनी सर्वांनाच सापसोडे म्हटले नसून गुप्तचर विभागाकडून जी माहिती आली, त्याआधारे त्यांनी हे विधान त्यांनी केले आहे. या मध्ये वारकर्‍यांची गैरसोय होऊ नये, त्यांच्यात घबराट निर्माण होऊ नये, म्हणून मुख्यमंत्र्यांनी शासकीय महापूजा न करण्याचा निर्णय घेतला होता.
 
मराठा समाजाला आरक्षण देणे हा आमचा राजकीय अजेंडा नसून ती आमची निष्ठा आहे. विरोधी पक्षात असताना आम्ही मराठा आरक्षणाची मागणी केली आहे. आम्ही हे आरक्षण देण्याबाबत कटिबद्ध आहोत. आमचे सरकार आल्यानंतर न्यायालयाने स्थगिती आदेश दिला, असे सांगतानाच राज्य सरकार कायदेशीर बाबींचा अभ्यास करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहोत.