गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2023 (21:37 IST)

आमदार रविंद्र वायकर यांच्या विरूद्ध ED कडून गुन्हा दाखल; तपासासाठी समन्स जारी होण्याची शक्यता

ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या विरूद्ध ED कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जोगेश्वरी मध्ये पालिकेच्या जागेवर लक्झरी हॉटेल उभारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी तपासासाठी समन्स जारी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणी वायकर यांच्यासह इतर आरोपींना ईडी चौकशीसाठी समन्स देखील पाठवू शकते.
 
ईडीनं 500 कोटी रुपयांच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणी रविंद्र वायकर यांच्याविरोधात ही केस दाखल करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत प्रवर्तन प्रकरण माहिती अहवाल (ईसीआयआर) दाखल केला आहे.
 
याबाबत अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ईडीनं रविंद्र वायकरशी संबंधित सर्व दस्ताऐवज आणि जबाब नोंदवण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून हे दस्ताऐवज त्यांनी प्राप्त झाले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
 
 
Edited By - Ratnadeep Ranshoor