सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (08:27 IST)

कारागृहातून आरोपींचे पलायन; पोलीस उपनिरीक्षकांसह सहा जणांचे निलंबन

शनिवारी पहाटे राहुरीच्या कारागृहामधून पाच आरोपींनी पलायन केले होते. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व पाच कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस हवालदार संजय राठोड, पोलीस नाईक संजयकुमार जाधव, रोहिदास गुंडाके, पोलीस शिपाई बाळू चाबुकस्वार, व महिला पोलीस शिपाई मनिषा गुंड अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत.
आरोपींनी कारागृहातून पलायन केल्याने कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्‍न चिन्ह उपस्थित झाले होते. या घटनेची माहिती मिळताच नाशिकचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांनी घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली.
याप्रकरणी उपमहानिरीक्षक शेखर पाटील यांनी अपर पोलीस अधीक्षक डॉ. काळे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यानंतर अधीक्षक पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक व पाच कर्मचार्‍यांचे निलंबन केले आहे.