सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 जून 2021 (16:41 IST)

चूक मान्य केल्यावरही ते संधी साधू शकतात, खडसे यांचा फडणवीसांना टोला

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पहाटे घेतलेली शपथ ही चूक होती असं मान्य केलं आहे. यावरून भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी निशाणा साधला आहे. चूक मान्य केल्यावरही ते संधी साधू शकतात, असा टोला एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना लगावला. तसंच सत्ता गेल्यापासून फडणवीस अस्वस्थ असून सत्ता स्थापन करण्यासाठी ते आजही तळमळत आहेत, असं खडसे म्हणाले.
 
देवेंद्र फडणवीस यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांच्यासोबत स्थान केलेलं सरकार ही चूक होती अशी कबुली दिली. यावरून एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांना चिमटा काढला. फडणवीस अस्वस्थ आहेत. कोणत्याही कारणाने सत्तेत आलं पाहिजे म्हणून त्यांनी अजितदादांसोबत सरकार स्थापन केलं. आता त्यांनी चूक मान्य केली आहे. पण चूक मान्य केल्यानंतरही अजूनही असा प्रसंग आला किंवा एखाद्या पक्षाने त्यांना ऑफर दिली तरी ते सत्ता स्थापन करतील, असा टोला त्यांनी लगावला.