सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (12:26 IST)

औरंगाबादमध्ये उत्खननात ब्रिटिश काळातील नाणी सापडली

औरंगाबादातील एमजीएम परिसरातील प्रियदर्शनी उद्यानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारले जात आहे. स्मारकाभोवती सुरक्षा भिंत बांधण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. .सोमवारी सायंकाळी भिंतीसाठी खणनकाम सुरू असताना या ठिकाणी प्राचीन नाणी सापडली. कंत्राटदाराने पालिका अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर हे नाणे पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. प्रियदर्शनी उद्यानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारले जात आहे.स्मारकाभोवती सुरक्षा भिंत बांधण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. स्मारकाच्या पाठीमागील भिंत खोदत असताना खोदकाम करणाऱ्यांना एका कापडी पिशवीत काही तरी सापडले . त्यांनी काम थांबवून पिशवी बाहेर काढली आणि पिशवी उघडून पाहिल्यावर त्यांना त्यात ब्रिटिश काळातील नाणी सापडली .मजुरांनी तातडीने ही माहिती कंत्राटदार रोहित स्वामींना दिली .उत्खनन कामाच्या ठिकाणी रोहित स्वामी पोहोचल्यावर त्यांनी उत्खनन करताना पिशवी सापडल्याची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना  दिली .वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार, रोहित स्वामींनी नाण्याची पिशवी पुरातत्त्व विभागाकडे देण्यात आली . अधिकारी गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिशवीत ठेवलेल्या नाण्याचे वजन 1 किलो 958 ग्रॅम आहे. ही नाणी व्हिक्टोरिया राणीच्या काळातील असून .नाणी 1854, 1861, 1881 च्या तारखेची आहेत. नाणी तांबे किंवा पितळ्याची असावी असा अंदाज गोरे यांनी दर्शविला आहे.