सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: लातूर , सोमवार, 19 ऑक्टोबर 2020 (14:19 IST)

फडणवीस उद्या करणार पाहणी दौरा

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवार, 20 रोजी लातूर जिल्ह्याच्या दौर्यापवर येणार आहेत. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांकच्या पिकांचे व जमिनींचे मोठे नुकसान झाले. 
 
ऊस, फळबागा उद्‌ध्वस्त झाल्या, पुरामुळे जमिनीसह पिकांचे नुकसान झाले,सोयाबीनच्या गंजी वाहून गेल्या. शेतकर्यांवर संकट कोसळले. नुकसानग्रस्त भागाची पाहणी फडणवीस हे मंगळवारी करणार आहेत. ते औसा तालुक्यातील उजनी व बुधोडा येथे पाहणी करून शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी माजीमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड, खासदार सुधाकर श्रृंगारे उपस्थित राहणार आहेत.