मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (15:30 IST)

पोटच्या मुलीवर बापाने 7 महिने केले अत्याचार, गर्भवती राहिल्याचे समजल्यावर गर्भाची विल्हेवाट लावली

ठाण्यातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. ठाण्यातील शहापूर तालुक्यात एका बापाने पोटच्या मुलीवरच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
 
याबाबत मुलीच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर उघडकीस आलेल्या धक्कादायक प्रकारात नराधम पिता गेल्या 7 महिन्यांपासून मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता असे कळून आले.
 
आरोपीला दोन मुली असून त्यातील एक 13 वर्षाची मोठी मुलगी आरोपी पितासोबत तर दुसरी 6 वर्षाची मुलगी आईसोबत भगतपाडा येथे राहत होती. आरोपी आणि त्याची पत्नीचं बऱ्याचं दिवसांपासून पटत नसल्याने ते वेगळे राहत होते. आरोपी जानेवारी महिन्यांपासून मेंगाळपाडा येथे राहत होता. या दरम्यान आरोपी गेल्या 7 महिन्यांपासून मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता. 
 
याहून धक्कादायक म्हणजे या अत्याचारातून पिडीत मुलगी गर्भवतीदेखील राहिली होती. मात्र काही दिवसांनतर आपोआपच पिडीतेच्या पोटातील गर्भाचा मृत्यू झाला. नंतर आरोपीला हा प्रकार समजताच त्याने गर्भाची विल्हेवाट लावल्याने प्रकरण उघडकीस आले नाही.
 
आरोपीने पुरावे नष्ट केले मात्र पिडीतेच्या आईला याबद्दल समजल्यावर आईने मुलीला याबाबत विचारल्यावर प्रकार समोर आला. मुलीच्या आईला सर्व प्रकरण समजताच तिने तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबत तक्रार दिली.