गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जानेवारी 2020 (14:57 IST)

पहिला आलेल्या मुलाला वर्गाबाहेर बसवले : फडणवीसांचा संताप

वर्गातपहिला आलेल्या मुलाला वर्गाबाहेर बसवले गेले,' अशी खंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. 
 
पालघर येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात फडणवीस बोलत होते. जनतेने युतीला जनमत दिले होते, मात्र
शिवसेनेने बेईमानी केली. सत्तेसाठी शिवसेना या थराला जाईल असे वाटले नव्हते. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना शब्द दिला होता की मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिवावर शिवसेनेचा मुख्यमं‍त्री होईल असा शब्द दिला होता का?, असा सवाल फडणवीस यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या कर्जामाफीच्या निर्णयावरही फडणवीस यांनी टीका केली. 'शेतकर्‍यांना  विनाअट, सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा शिवसेनेने केली होती. सातबारा कोरा करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, ते ठाकरे सरकारने पाळले नाही.