1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 मार्च 2020 (16:40 IST)

मराठा आंदोलकांच्या मागण्या मार्गी लावा, नाहीत तर रस्त्यावर उतरू

maharashtra news
राज्य सरकारने आझाद मैदानावरील मराठा आंदोलकांच्या मागण्या लवकरात लवकर मार्गी लावल्या नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला आहे. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. छत्रपती संभाजीराजे आज आझाद मैदानावर आंदोलन करत असलेल्या मराठा आंदोलकांची भेट घेण्यासाठी आले होते. 
 
मराठा तरुणांच्या आंदोलनाचा आज ३६ वा दिवस आहे. आंदोलनकर्त्यांनी अन्नत्याग केल्यानंतर दोन तरुणांची प्रकृती बिघडली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी या आंदोलकांशी संवाद साधला. 
 
मराठा आंदोलकांच्या मागण्यांना कोणाचाच विरोध नाही तर मग निर्णय का घेतला जात नाही?, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला. सरकार काही अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार वागत आहे. ही बाब योग्य नाही. सरकारने आता युद्धपातळीवर निर्णय घ्यायला पाहिजे. आपण यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत असेही संभाजीराजे यांनी सांगितले.