सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (08:23 IST)

RILs मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना ताज्या धमक्या, मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले

mukesh ambani
सोमवारी सकाळी रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयातील दूरध्वनीवर धमकीचा फोन केला होता. त्यानं फोनवरून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांत डी. बी. मार्ग पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.
 
विष्णू विधू भोमीक असं अटक केलेल्या ५६ वर्षीय आरोपीचं नाव आहे. त्याला डी बी मार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे. त्याची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे, याबाबतची माहिती झोन २ चे डीसीपी निलोत्पल यांनी माध्यमांना दिली आहे. आरोपी विष्णू याला पोलिसांनी बोरिवली पश्चिम परिसरातून अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?
सोमवारी सकाळी ७-८ च्या सुमारास रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयातील दूरध्वनीवर मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकारानंतर रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या धमकीच्या फोनबाबत तात्काळ माहिती दिली.