मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

आई शप्पथ मला ठाण्यात रहायचे नाही: संजीव जयस्वाल

एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने भावनिक आवाहन केल्याची प्रथमच वेळ असावी, कारण ठाण्याचे मनपा आयुक्त यांनी या ठिकाणी आता नको अशी भावनिक साद दिली आहे. त्यामुळे सत्तधारी भाजपावर आता शरमेची वेळ आली आहे.  आयुक्त म्हणतात की ज्यांनी माझा ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसीडर म्हणून वापर केला, ज्यांच्या नजरेत मी कालपर्यंत हीरो होतो, त्यांनीच मला आज झिरो केले आहे. माझ्यावर वैयक्तिक टीका करुन माझ्या बदलीसाठी प्रयत्न केले जात आहेत असे त्यांनी सांगितले आहे. 
 
आयुक्त पुढे म्हणतात की मलाच ठाणे येथे आयुक्त म्हणून  राहण्याची अजिबात इच्छा नाही, तर दुसरीकडे शासन देखील माझी बदली करीत नाही, त्यामुळे आता सभागृहानेच माझ्या विरोधात अविश्वास ठराव करावा आणि मला येथून परत पाठवावे. आई शप्पथ या ठरावाला मी कोणताही विरोध करणार नसल्याचे भावनिक आवाहन ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे. तर तसे झाले नाही तर मी सुट्टीवर जाणार आहे.  
 
ठाणे मनपाची महासभा सुरु होताच, मुंब्रा स्टेडीयमचा मुद्यावरुन राष्ट्रवादी कोन्ग्रेस व भाजपामध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती. त्यात  भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी पोलिसांना बाईक देण्याच्या प्रकरणावरुन सभा तहकुबी मांडली . त्यामुळे प्रशासनातील सर्वच अधिकारी चिंतेत होते. त्यात मुंब्य्राच्या स्टेडीअमवर सुरु असलेल्या वादाच्या वेळेस देखील भाजपाच्या नगरसेवकाने प्रशासनाने मोबाईलवर वाचलेल्या पत्रावर आक्षेप घेतल्याने आयुक्त संतप्त झाले. त्यानंतर त्यांनी बदलीसाठी भावनिक आवाहन केले आहे. त्यामुळे सत्तधारी भाजपवर अधिकारी सुद्धा वैतागले आहेत. यावर आता मुख्यमंत्री काय भूमिका घेतात हे पाहणे गरजेचे आहे.