1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 जानेवारी 2019 (09:04 IST)

स्वाभिमानीचे आज ‘हल्लाबोल आंदोलन’

चालूवर्षीच्या एफआरपीची रक्कम एकरकमी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ‘हल्लाबोल आंदोलन’ सोमवारी दि. २८ रोजी साखर आयुक्तालयावर धडकणार आहे. अलका टॉकीज चौकातून दुपारी बारा वाजता मोर्चा काढून आंदोलन साखर संकुलवर  पोहोचणार असून मागण्या मान्य झाल्याशिवाय आयुक्तालयासमोरुन उठणार नसल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी यापुर्वीच दिलेला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे.
 
राज्यात ३१ डिसेंबरअखेर गाळप झालेल्या उसाच्या एफआरपीचा ताजा अहवाल १५ जानेवारीस प्राप्त झाला. त्यामध्ये कारखानानिहाय स्थिती पाहता एफआरपीचा देय आकडा १० हजार ४८७ रुपये आहे. तर प्रत्यक्षात कारखान्यांनी शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर ५ हजार १६६ रुपये जमा केलेले आहेत. तर ५ हजार ३२० कोटी रुपये शेतकर्‍यांना देणे बाकी राहिलेले आहे. जवळपास २५ हून अधिक साखर कारखान्यांनी तीन महिन्यानंतरही शेतकर्‍यांना एफआरपीची शून्य टक्के रक्कम दिलेली आहे.