सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 18 नोव्हेंबर 2020 (16:30 IST)

हिंदुत्व विचार व शिवसेना हे समीकरण नाही : नारायण राणे

“शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला नाही, गद्दारी करून ते सत्तेत गेले आहेत. उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नाहीत. तडजोड करणारे, पदासाठी हवं ते करणारे आहेत. त्यामुळे हिंदुत्व विचार व शिवसेना हे समीकरण नाही.” असा घणाघात भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. तसेच, आमदार राम कदम यांच्या जनआक्रोश यात्रेला आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचंही त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं.
 
पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीसाठी,  भाजपा आमदार राम कदम यांनी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं. मात्र, ही यात्रा निघण्या अगोदरच राम कदम यांना पोलिसांनी त्यांच्या निवास्थानावरून ताब्यात घेतलं होतं. यानंतर भाजपा नेते नारायण राणे व आमदार नितेश राणे यांनी राम कदम यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस ठाणे गाठलं होतं. यानंतर नारायण राणेंनी माध्यमांशी संवाद साधला.