testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

होळी अन रंगोत्सव साजरा करतांना घ्या खबरदारी

Last Modified मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018 (15:32 IST)
वीज वितरण यंत्रणांपासून सावधानता बाळगण्याचे महावितरणचे आवाहन होळी,
धुळवड आणि विविध रंगांची उधळण करीत येत असलेल्या रंगपंचमी या सलग सणांच्या मालिकेत संभाव्य वीज अपघात टाळण्यासाठी खबरदारीची आवश्यकता आहे. होळी पेटविताना व रंगांची उधळण करताना वीज वितरण यंत्रणांपासून सावधानता बाळगून सणांचा आनंद द्विगुणित करावा,
असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
सभोवताली वीज वाहिन्या किंवा रोहित्र नाहीत,
याची खातरजमा करूनच होळी पेटवावी. अन्यथा होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जिवंत तार खाली पडून अपघाताचा धोका संभवतो. तसेच अनेक ठिकाणी वीज वाहिन्या भूमिगत टाकण्यात आल्या असून या भूमिगत वीज वाहिन्यांपासून दूर अंतरावर होळी पेटवावी. जेणेकरून भूमिगत वीजवाहिन्या सुरक्षित राहतील. शक्यतो मोकळ्या जागेत,मैदानावर होळी पेटवावी. विजेचे अपघात प्राणघातक ठरू शकतात,
एक चूकही जीवावर बेतू शकते हे लक्षात ठेऊन आवश्यक ती काळजी घ्यावी.
रंगोत्सव साजरा करतांना पाण्याचा फवारा वीज वाहिन्यांपर्यंत उडणार नाही याची खबरदारी घ्यावी. भरलेले फुगे परस्परांवर टाकतांना ते वीज वितरण यंत्रणांना लागणार नाहीत,
याची काळजी घ्यावी. ओल्या शरीराने वीज वितरण यंत्रणांना स्पर्श करणे टाळा. विजेच्या खांबाभोवती पाण्याचा निचरा होणार नाही याची दक्षता घ्या. घरात होळी खेळतांना वीज मीटर,विजेचे प्लग,
वीजतारा व वीज उपकरणांचा पाण्यापासून बचाव करा व ओल्या हाताने या वस्तू हाताळणे टाळा. आवश्यक ती खबरदारी घेऊन होळी,
धुळवड व रंगपंचमीचा आनंद द्विगुणित करावा,
असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.
हे लक्षात ठेवा
-
वीज वितरण यंत्रणेपासून दूर अंतरावर होळी पेटवा
-
वीज वाहिन्या,
वितरण रोहित्रांवर पाणी फेकू नका
-
ओल्या हाताने वीज वितरण यंत्रणा व उपकरणे हाताळणे टाळा
-वीज वितरण यंत्रणांभोवती पाण्याचा निचरा करू नका


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

टीएचईच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 93 व्या ...

national news
यावर्षीच्या टाइम्स हायर एज्युकेशन म्हणजेच टीएचईच्या प्रतिष्ठित ‘Higher Education Emerging ...

दुसऱ्या राज्यांच्या तपासावर अवंलबून राहणे लाजीरवाणे

national news
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी मुंबई हायकोर्टाने सीबीआयला फटकारले आहे. दुसऱ्या ...

पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक उद्या दोन तासासाठी बंद

national news
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरील रसायनीजवळ ओव्हरहेड गँट्रीज बसवण्यात येण्यार आहे. त्यामुळे ...

पुन्हा एकदा आरबीआयकडून बॅंक ऑफ महाराष्ट्रला दंड

national news
रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने 'बॅंक ऑफ महाराष्ट्र'वर एक कोटींचा दंड ठोठावला आहे. ग्राहकांना ...

डान्सबारवरील संपूर्ण बंदीला न्यायालयाचा नकार

national news
डान्सबार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारने केलेले नियम आणि अटी सर्वोच्च ...