होळी खेळा आपल्या राशीनुसार
मेष : मेष राशीच्या लोकांनी सकाळी होलीकापूजन करायला पाहिजे, महादेवाचे दर्शन करावे. होळी खेळण्यासाठी लाल रंग किंवा लाल गुलालाचा प्रयोग करावा.
वृषभ : वृषभ राशीच्या जातकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, होळी पूजन झाल्यानंतर कन्यापूजन करायला हवे.
होळी खेळण्यासाठी हलक्या पिवळ्या रंगाचा प्रयोग करावा.
मिथुन : मिथुन राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, गणपतीचे दर्शन करावे. होळी खेळण्यासाठी हिरव्या रंगाचा प्रयोग करावा.
कर्क : कर्क राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे व त्यानंतर महादेवाची पूजा अवश्य करावी. होळी
खेळण्यासाठी पांढऱ्या कापडाचा वापर करावा व गुलालानेच होळी खेळावी.
सिंह : सिंह राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, त्याचबरोबर सूर्य देवाची पूजा करायला पाहिजे. होळी
खेळण्यासाठी लाल गुलाल व मरून रंगाचा प्रयोग करावा.
कन्या : कन्या राशीच्या लोकांनी होळी-पूजनानंतर गणपतीसोबत कुबेर देवाचे दर्शन करावे. होळी खेळण्यासाठी टेसूच्या रंगांचा वापर करावा.
तूळ : तूळ राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे नंतर देवीचे पूजन करावे. होळी खेळण्यासाठी लाल व
पिवळ्या रंगांचा प्रयोग करावा.
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, नंतर रिद्धी-सिद्धिसमेत गणपतीची पूजा केली पाहिजे. होळी खेळण्यासाठी गुलाबी रंगाचा प्रयोग करावा.
धनू : धनू राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, दत्तात्रेय (गुरू महाराज)चे पूजन करावे. होळी खेळण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर करावा.
मकर : मकर राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, राम व मारुतीचे दर्शन करावे. होळी खेळण्यासाठी
हलका गुलाबी व पिवळ्या रंगांचा वापर करावा.
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, व मारुतीचे दर्शन करावे. होळी खेळण्यासाठी हिरव्या व शेंदुरी रंगांचा वापर करावा.
मीन : मीन राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, गुरुचे पूजन करावे. होळी खेळण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर करावा.