1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 31 ऑक्टोबर 2019 (16:15 IST)

महाराष्ट्रात २० लाख हेक्टर वरील सोयाबीन धान कापुस व तुरीचे प्रचंड नुकसान

यावर्षी ऐन दिवाळीत प्रचंड वादळी पाऊसाने कहर केला असुन अख्ख्या महाराष्ट्रात अंदाजे कमीतकमी २० लाख हेक्टरमधील सोयाबीन धान कापुस व तुरीचे सह भाजीपाला व फळ बागायतीचे प्रचंड नुकसान झाले असून मात्र आठवड्याभरापासून शेतकऱ्यांचा एकही फोन विमा कंपन्या, कृषी व महसूल विभाग उचलत नसुन याउलट ४८ तासात नुकसानीची सुचना न देणाऱ्यास विमा मिळणार नाही असा फतवा पाठविण्यात येत आहे. 
 
कृषी व महसूल विभागाचे कर्मचारी व अधिकारी आचार संहिते व दिवाळीच्या सुट्टीचे कारण देत असुन एकही विमा कंपनीचा कर्मचारी व अधिकारी उपलब्धच नसुन एकही तालुका वा जिल्हास्तरीय कार्यालयात मागील आठ दिवसापासून काळा कुत्राही नसल्याचा अनुभव चकरा मारणाऱ्या शेतकऱ्यांना येत आहे अशा परिस्थितीमध्ये शिवसैनिकांनी मदतकेंद्र उघडुन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची तालुकानिहाय यादी तयार करावी व विमा कंपन्यांना सरसकट नुकसान भरपाईसाठी शिवसेनेचे बदडा आंदोलन करण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन शेतकरी नेते व शिवसेना प्रमुखांचे कृषी सल्लागार किशोर तिवारी यांनी केले आहे
 
दिवाळीच्या एकदिवसा पूर्वीपर्यंत आठवाड्याभरापासून महाराष्ट्रात अवकाळी परतीच्या दमदार पाऊस सुरू होता. ऐन दिवाळीमध्येही पावसाने विदर्भ आणि मराठवाड्यतील जिल्ह्यातील अनेक गावांना झोडपून काढले. शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत या विभागातील ११६  महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसानंतर मराठवाड पाठोपाठ आता विदर्भातील अनेक जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे.
 
या अवकाळी पावसाने केलेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे मात्र नवनिर्वाचित आमदार व त्यांचे चमचे आपली सोया लावण्यात गुंतले असल्याने परिस्थीती बिकट झाली आहे त्यातच विमा कंपन्यांची दलाली करणारे सनदी अधिकारी विदेशात दिवाळी साजरी करीत असल्याच्या बातम्या खबरी देत असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे.