बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जुलै 2020 (21:00 IST)

यूजीसी 29 एप्रिलला सांगितले असते, तर तशी तयारी केली असती

परीक्षा घ्यायचीच आहे, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) 29 एप्रिलला सांगितले असते, तर तशी तयारी केली असती’, असे सांगत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यूजीसीच्या निर्णयाने विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होत असल्याची टीका केली. राज्यातील कुलगुरूंना प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची परिस्थिती माहिती असल्याने आम्ही कुलगुरूंशी चर्चा करूनच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
राज्य सरकारने विद्यापीठ स्तरावरील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या असताना यूजीसीच्या नव्या मार्गदर्शक सूचनेद्वारे परीक्षा सप्टेंबरपर्यंत घेण्याचे निर्देश दिल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये सामंत यांनी यूजीसीने २९ एप्रिलला प्रथम जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्येच परीक्षा घेणे बंधनकारक केले असते तर आम्ही परीक्षेची तयारी केली असती. त्याचप्रमाणे या सूचनांसंदर्भात आम्ही वारंवार पत्रव्यवहार करूनही तीन महिन्यात यूजीसीकडून कोणतेही उत्तर आले नाही. विद्यार्थ्यांच्या परिस्थितीची माहिती कुलगुरूंना असल्याने आम्ही त्यांच्याशी चर्चा करूनच परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे.