Widgets Magazine
Widgets Magazine

तीन दिवसापासून राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार विजेता छोट्या भावासह बेपत्ता

शनिवार, 20 मे 2017 (14:05 IST)

nilesh

राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार विजेता निलेश भिल छोट्या भावासह बेपत्ता झाला आहे. निलेशची आई सुंदरबाई रेवाराम भिल यांनी 19 मे रोजी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनमध्ये दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. निलेश भिल हा जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात राहतो.  निलेश भिल आणि त्याचा भाऊ गणपत भिल 17 मे रोजी बेपत्ता झाले. निलेश रेवाराम भिल हा 12 वर्षांचा असून त्याचा लहान भाऊ गणपत रेवाराम भिल 7 वर्षाचा आहे. 30 ऑगस्ट 2014 रोजी मुक्ताई मंदिरासमोर भाविकांसाठी तयार केलेल्या घाटात भागवत घोगले हा मुलगा पाय घसरुन पडला. त्यावेळी निलेशने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली. काही मिनिटातच भागवतला पाण्यातून सुखरुप बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. या धाडसाबद्दल निलेशला 26 जानेवारी 2016 ला राष्ट्रीय बालशौर्य पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्याविरोधात सांताक्रूझ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल ...

news

उत्तराखंडमध्ये भूस्खलन होऊन 15 हजार भाविक अडकले

उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळे जवळपास 15 हजार भाविक अडकले आहेत. यामध्ये ...

news

लालू प्रसाद यादव यांचा टोमणा भाजपचे तारुण्य आता संपले

राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी भाजपवर टोमणा मारला आहे की भाजपचे तारुण्य संपले आहे, ...

news

कर्जमाफीसाठी आम्ही म्हायुतीत आलो : राजू शेट्टी

शेतकरी कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोग लागू करणार यासाठी मी महायुतीत आलो होत. मात्र तसे ...

Widgets Magazine