testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

राज्यातील शिक्षणव्यवस्थेची स्थिती गंभीर- पाटील

कोणत्याही परिक्षांचे पेपर फुटतात. पेपर फुटून ते सर्वांपर्यंत कसे पोहोचतील, याची खबरदारी घेतली जाते. आपल्या राज्यात शिक्षणव्यवस्थेला काय झाले आहे?, असा प्रश्न जनतेला पडला आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षणव्यवस्थेची स्थिती गंभीर आहे, असा आरोप विधिमंडळ गटनेते जयंत पाटील
यांनी केला. विधानसभेत शिक्षण विभागातील समस्यांबाबत सुरु असलेल्या चर्चेत त्यांनी सहभाग घेतला. अशी परिस्थिती असूनदेखील सरकार ढिम्म आहे. त्यावर काहीच करत नाही. महाराष्ट्राची ही प्रतिमा बदलण्याची गरज आहे. सरकार यासाठी काय करणार आहे, असा प्रश्न त्यांनी सरकारला केला.

ते पुढे म्हणाले की राज्यात शिष्यवृत्तीचा घोटाळा झाला आहे. यावर चौकशीसाठी एक समिती गठीत केली होती. त्या समितीचा अहवाल आला. मात्र त्या अहवालात काय आहे, हे अजून स्पष्ट झाले नाही. २०१६-१७ या वर्षासाठी अजूनही ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या मिळाल्या नाहीत. सरकारला शिष्यवृत्त्या देता येत नसतील तर सरकार जाहिरातीवर खर्च का करते?
सरकारला ‘ऑनलाईन’चा रोग जडला आहे. सर्व गोष्टी ऑनलाईन, कर्जमाफीसाठी ऑनलाईन फॉर्म, शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन फॉर्म. पण त्याचे होत काहीच नाही. या गोरगरीब मुलांच्या शिक्षणातला अडथळा कधी दूर होणार? या मुलांना कधी शिष्यवृत्त्या मिळणार, हे सरकारने स्पष्ट करावे, असे ते म्हणाले.

विनोद तावडे यांनी शिक्षण खात्याकडे लक्ष द्यावे. त्यांच्यावर कामाचा भार जास्त असेल, तर त्यांच्याकडे असलेल्या सांस्कृतिक खात्याचा भार दुसऱ्या कुणाकडे द्यावा. पण आदिवासी भागातील शाळा बंद करणे योग्य नाही. शिक्षकांचा दर्जा वाढायला हवा, मागील तीन वर्षात सरकारने किती शिक्षकांची भर्ती केली, याची माहिती सभागृहाला मिळायला हवी. आम्ही एमपीएससी परिक्षांचे प्रकरण बाहेर काढले. ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांना मोर्चे काढावे लागत आहेत. त्यांना न्याय मिळणार आहे की नाही? या प्रकरणाची ‘सीबीआय’मार्फत चौकशी करा. तामिळनाडूप्रमाणे आपल्या राज्यात परिक्षांचा काही वेगळा पॅटर्न तयार करता येतो का ते पहा, अशी सूचना त्यांनी केली.
आपल्या राज्यात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कर आकारला जातो. मुंबई विद्यापीठाने काम योग्य पद्धतीने न करण्याचा विश्वविक्रम केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड हाल सहन करावे लागले. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

दोघातील भांडणातून पुण्यातील गंज पेठेत जाळल्या दुचाकी गाड्या

national news
पुण्यात पुन्हा दुचाकी जळीत कांड झाले असून,दोघांमधील वादातून रस्त्यावर पार्क केलेल्या ...

सतत जाड म्हणून पत्नीचा छळ, नवरयावर दाखल झाला गुन्हा

national news
बीकेसीमध्ये राहणाऱ्या एका तरुणीचा विवाह आई वडिलांच्या पसंतीच्या मुलाशी झाला होता. हा ...

मुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून ...

national news
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात ...

प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र ...

national news
सुप्रीम कोर्टाने गुरुवारी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री ...

मप्र-राजस्थान-छत्तीसगडानंतर येथे देखील राहुल गांधींनी ...

national news
देशात झालेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ...

मुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून ...

national news
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात ...

प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र ...

national news
सुप्रीम कोर्टाने गुरुवारी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री ...

मप्र-राजस्थान-छत्तीसगडानंतर येथे देखील राहुल गांधींनी ...

national news
देशात झालेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ...

पुण्यात तब्बल ४ हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी जाहीर

national news
पुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तब्बल ४ ...

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस)च्या विद्यार्थीची ...

national news
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस) एमबीएच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ...