गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (21:31 IST)

राज्यात महाआघाडी समोर भाजपा २० टक्के देखील नाही : जयंत पाटील

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना तिन्ही पक्षांनी मिळून वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुका लढवलेल्या आहेत. सर्वात समाधानाची बाब ही आहे, या सर्व गडबडीत भाजपाचं अस्तित्व फार मर्यादित राहिलं आहे. राज्यात महाआघाडीसमोर भाजपा २० टक्के देखील नाही”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यामां समोर बोलून दाखवलं आहे. 
 
जयंत पाटील म्हणाले, “माझ्याकडे राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील निकालाची माहिती आहे. १३ हजार २९५ जागांच्या निवडणुका झाल्या आहेत. ३ हजार २७६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळाला आहे. काँग्रेसला १ हजार ९३८ जागांवर यश मिळालं आहे. भाजपा २ हजार ९४२ जागांवर विजयी झाली आहे व शिवसेना २ हजार ४०६ जागांवर विजयी झालेली आहे, अशा माझ्याकडे आलेली माहिती आहे. त्यामुळे आकडे बोलके आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस हा तळागाळातील पक्ष आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे सर्वात जास्त उमेदवार निवडून आलेले आहेत.”
 
तसेच, “वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळे पक्ष पुढे आहेत परंतु, राज्यात महाआघाडी समोर भाजपा २० टक्के देखील नाही, असं चित्र सध्या आहे.” असं देखील यावेळी जयंत पाटील यांनी सांगितलं.