शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

किसान सभेचा मोर्चा आझाद मैदानात दाखल

विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईकडे पायी निघालेला किसान सभेचा मोर्चा आझाद मैदानात दाखल झाला आहे. सोमवारी सकाळी पहाटे पाच वाजेच्या सुमारास तो आझाद मैदानावर आला.  याआधी सोमय्या मैदानातून रात्री उशीरा मोर्चेकऱ्यांनी आझाद मैदानाकडे कूच केली. परीक्षांच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोर्चेकऱ्यांनी रात्रीत निघण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पहाटे आझाद मैदानात जाऊन सरकारचे प्रतिनिधी म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. 
 
आता आझाद मैदानात मोर्चेकऱ्याची भव्य सभा होणार आहे.  किसान सभेचे आणि कम्युनिस्ट पार्टीचे राष्ट्रीय नेते सभेत सहभागी होणार आहेत.  संध्याकाळी कम्युनिस्ट पार्टीचे (मार्क्सिस्ट) नेते खासदार सीताराम येचुरी आणि ऑल इंडिया किसान सभेचे अध्यक्ष आमरा राम सभेला संबोधित करणार आहेत.
 
दुसरीकडे मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या समितीत एकूण 6 मंत्री असतील. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख यांचा या समितीत समावेश आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती मोर्चेकऱ्यांच्या प्रतिनिधींशी सोमवारी दुपारी 12 वाजता चर्चा करणार आहे.