testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

भीमा-कोरेगावच्या घटनेला सरकारची स्पॉन्सरशिप होती का?- धनंजय मुंडे

bhima kopargaon
भीमा-कोरेगाव परिसरात १ जानेवारीच्या आधी काही संघटनांनी वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता. याची माहिती स्थानिक पोलिसांना होती. तरीदेखील सरकारने १ तारखेला घटनास्थळी जाणीवपूर्वक पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवला नाही आणि दंगल होऊ दिली. त्यामुळे भीमा-कोरेगावच्या घटनेला सरकारची स्पॉन्सरशिप होती का?, असा प्रश्न सर्वांना पडला असल्याचे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे
यांनी व्यक्त केले. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत ते बोलत होते.

धनंजय मुंडे पुढे म्हणाले की हे ज्यांच्यामुळे घडले, त्यांना सरकार अटक करत नाही. सरकार त्या दोन व्यक्तींसमोर किती हतबल झाले आहे, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. दंगलीच्या घटनेला प्रतिक्रिया म्हणून लोकांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला. या वेळी राज्यभर कोम्बिंग ऑपरेशनही राबवले गेले. औरंगाबाद येथे एका निष्पाप गरोदर महिलेवर स्वतः पोलीस आयुक्तांनी कारवाई करत अत्याचार केल्याची माहिती मिळाली आहे.
भीमा-कोरेगावचा प्रश्न गंभीर असून यावर आ. अॅड. जयदेव गायकवाड
यांनी विधानपरिषदेत २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला आहे आणि सरकारतर्फे ठोस उत्तर मिळावे, अशी अपेक्षा केली आहे. पण, या प्रश्नाचा निकाल प्रश्नोत्तराच्या तासातच लावावा, हे सरकारमधील सदस्य सांगत आहेत. हे अतिशय दुःखद आहे, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले.

गेल्या दोनशे वर्षांपासून असंख्य लोक भीमा कोरेगावला संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेत असतात. मात्र या वर्षी काही समाजकंटक घटकांनी तिथे जमलेल्या अनुयायांवर पूर्वनियोजित भ्याड हल्ला केला. एका तरुणाचा मृत्यू झाला. घटनेला दोन महिने उलटूनही अद्याप हल्लेखोर आणि सूत्रधारांना अटक झालेली नाही. याबाबत शासन काय कारवाई करत आहे? याबाबत २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडून सरकारला अॅड. आ. जयदेव गायकवाड यांनी जाब विचारला.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

दोघातील भांडणातून पुण्यातील गंज पेठेत जाळल्या दुचाकी गाड्या

national news
पुण्यात पुन्हा दुचाकी जळीत कांड झाले असून,दोघांमधील वादातून रस्त्यावर पार्क केलेल्या ...

सतत जाड म्हणून पत्नीचा छळ, नवरयावर दाखल झाला गुन्हा

national news
बीकेसीमध्ये राहणाऱ्या एका तरुणीचा विवाह आई वडिलांच्या पसंतीच्या मुलाशी झाला होता. हा ...

मुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून ...

national news
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात ...

प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र ...

national news
सुप्रीम कोर्टाने गुरुवारी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री ...

मप्र-राजस्थान-छत्तीसगडानंतर येथे देखील राहुल गांधींनी ...

national news
देशात झालेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ...

मुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून ...

national news
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात ...

प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र ...

national news
सुप्रीम कोर्टाने गुरुवारी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री ...

मप्र-राजस्थान-छत्तीसगडानंतर येथे देखील राहुल गांधींनी ...

national news
देशात झालेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ...

पुण्यात तब्बल ४ हजार घरांसाठी म्हाडाची लॉटरी जाहीर

national news
पुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तब्बल ४ ...

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस)च्या विद्यार्थीची ...

national news
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस) एमबीएच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ...