सोमवार, 29 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 मे 2019 (10:04 IST)

बिबट्यावर दगडफेक

नाशिक शहरालगत असलेल्या गिरणारे गावात माणुसकीला न शोभणारी घटना घडली आहे. या गावातील एका तलावावर तहानलेला बिबट्या पाणी पिण्यासाठी आला होता. मात्र हुल्लडबाज बघ्या लोकांनी त्याला पाणी पिऊ दिलेच नाही उलट त्याच्या मागे पळत त्याच्यावर जमावाने जोरदार दगडफेक केली आहे. त्या बिबट्याचे सुदैव की त्याला वनविभागाने ताब्यात घेतले नाहीतर त्या मुक्या जनावराला आपला जीव गमवावा लागला असता.
 
तहानलेला सदरचा बिबट्या नाशिक तालुक्यातील गिरणारे गावापासून पुढे असलेल्या लाडची गावाच्या शिवारातील एका लहानशा तलावावर पाणी पिण्यासाठी आला होता. हा बिबट्या  सर्वात आधी शेतकरी हिरामण फरसाळे यांच्या शेतात शिरला आणि एका उंच झाडाच्या शेंड्यावर आश्रय घेतला. ही गोष्ट सर्वत्र पसरली त्यामुळे या परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. त्यामुळे वन विभागा्च्या कर्मचाऱ्यांना बिबट्या खाली उतरेपर्यंत वाट पाहावी लागली. मात्र काही तासांनी हा तहानलेला बिबट्या  खाली उतरा आणि जवळच्या तलावावर गेला. तेव्हा जमलेल्या लोकांनी त्याच्याकडे पळत जोरदार दगडफेक केली होती. तर दुसरीकडे वनविभाग या बिबट्याला पकडायला तयारी निशी आले होते. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला ट्रँम्यूलायझिंग गनच्या साह्याने बेशुद्ध केला आणि पकडले आहे.