रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (15:53 IST)

विधान परिषद धुळे नंदुरबार पोटनिवडणुक, भाजपाचे अमरिश पटेल विजयी

विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीत भाजपाचे अमरिश पटेल यांचा विजय झाला.  या विभागात ९९ टक्के मतदान झाले होते.  धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचे अमरिश पटेल ३३२ मतांसह विजयी झाले. तर काँग्रेसचे अभिजित पाटील यांना केवळ ९८ मते मिळाली. त्यामुळे भाजपाचा येथील पोटनिवडणुकीत दणदणीत विजय झाला.
 
अमरिश पटेल यांनी विरोधकांची ११५ मते फोडण्यात यश मिळवले. या निवडणुकीसाठी भाजपाच्या १९९ तर महाविकास आघाडीच्या २१३ सदस्यांनी मतदान केले होते. त्यात महाविकास आघाडीच्या आणि विशेषत: काँग्रेसच्या ५०हून अधिक मतदारांनी क्रॉस व्होटिंग झाले.  कारण काँग्रेसचे संख्याबळ १५७ असतानाही पाटील यांना केवळ ९८ मतेच मिळाली. तर, महाविकास आघाडीच्या अंदाजे ११५ मतदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचेही चित्र दिसत आहे. कारण महाविकास आघाडीची एकत्रित मिळून एकूण २१३ मते होती पण अभिजीत पाटील यांना शंभरीही गाठता आली नाही.