मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पोलिसांच्या वर्दीतील टोपी बदलली

राज्यातील पोलिसांच्या वर्दीची डोक्यावरील 70 वर्ष जुन्या टोपीने आता रुप बदललं आहे. वाशिम जिल्ह्यातील पोलिसांना नवीन टोपीचं वाटप करण्यात आले आहे. पोलीस गणवेशात बेसबॉल खेळातील टोपीप्रमाणे अतिरिक्त टोपीचा समावेश करण्याचा आदेश पोलिस महासंचालकांनी 24 एप्रिल 2019 रोजी दिला. यासंदर्भात परिपत्रक काढण्यात आलं आहे. तर 70 वर्ष जुन्या टोपीची सक्ती केवळ पोलीस कार्यालयीन तपासणी आणि परेडसाठीच असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.  या टोपीला येणारा खर्च हा शासनाकडून कर्मचाऱ्यांना मिळणारे पाच हजार रुपये यामधून करण्यात येणार असल्याचं जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी सांगितलं. 
 
पोलिसांना जुनी टोपी वापरताना अनेक अडचणी भेडसावत होत्या. जुनी टोपी डोक्यात व्यवस्थित न बसणे, गुन्हेगारांचा पाठलाग करताना टोपी पडणे अशाप्रकारच्या तक्रारी येत होत्या. त्यानंतर या नव्या बेसबॉल कॅपच्या वापराचा पर्याय समोर आला. त्यानुसार या बेसबॉल कॅपच्या प्रयोगानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानंतरच या नव्या बेसबॉल कॅपचा वापर करण्यात येणार आहे.