शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, राज्यात दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता

आथिक राजधानी मुंबई सोबतच इतर ठिकाणी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईच्या रस्त्यांवर पाण्याचे प्रमाण वाढले असून अनेक ठिकाणी पाणी साचले  आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे की  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र   वाढले असून,  अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग वाढला आहे, त्यामुळे मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर वाढला आहे असे  हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. दाब पुढील २-३ दिवस कायम राहणार असून, मुंबईतील कल्याण, वसई, विरार, नवी मुंबई, पालघऱ जिल्ह्यात दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. अजूनही हा पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. 
 
पुढचे दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट केले आहे. मागील २४ तासात कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असून महाराष्ट्र आणि वदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.तर नाशिक जिल्ह्यात सुद्धा जोरदार पाऊस सुरु असून त्यामुळे गोदावरीला पूर आला आहे. याचा फायदा जायकवाडी धरणाला होणार होणार आहे.  महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, दिल्ली, बिहार आणि उत्तरप्रदेशमध्येही जोरदार पाऊस सुरु आहे.  ३ ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असून कोकणात बुधवापर्यंत (३१ जुलै) मुसळधार पाऊस होणार असे वेधशाळेने वर्तवली आहे. पुणे आणि परिसरात महिनाअखेरीपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. पुढील चार दिवस विदर्भ आणि मराठवाडय़ामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.