testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मराठा क्रांती मोर्चा : 10 तारखेला महाराष्ट्र बंद नाही, अफवा पसरवणाऱ्याला अटक

maratha
Last Modified मंगळवार, 9 जानेवारी 2018 (11:01 IST)
महाराष्ट्रा साठी महत्वाची बातमी आहे.
कोरेगाव भीमा, सणसवाडी परिसरात झालेल्या दुर्दैवी प्रकारानंतर सामाजिक वातावरण बिघडले. त्यात
आता हे
वातावरण निवळत होते आणि सलोख्याचे वातावरण तयार होत असतानाच काही विघ्नसंतोषी लोकांनी सोशल मीडियावर 10 जानेवारी रोजी ‘महाराष्ट्र बंद’ आहे असे मेसेज करत ती पोस्ट सर्वत्र
फिरवले होते. मात्र
त्यात काहीही तथ्य नसून महाराष्ट्र बंद राहणार नाही, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज समन्वयक राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, प्रवीण गायकवाड, तुषार काकडे यांनी दिली आहे. उलट
त्या दुर्दैवी घटनेचा सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध नोंदवला असून
नुकसानग्रस्त बांधवांना भरपाई देण्याची मागणी त्यांनी
केली आहे. दंगलीमधील मृत तरुण राहुल फटांगडे याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वनही केले आहे. त्याच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपये मिळण्याची मागणी केली आहे.
प्रशासकीय पातळीवर या संधर्भात
कार्यवाही सुरू आहे. असे असतानाही समाजात गैरसमज पसरवण्याचे काम काही लोकांकडून केले जात आहे. महाराष्ट्रातील जनतेमध्ये पसरलेला गैरसमज दूर करण्याच्या हेतूने हे प्रसिद्धिपत्रक काढल्याचे कुंजीर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, 10 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद करण्यात आल्याची पोस्ट फेसबुकवर टाकणार्‍याविरुध्द गुन्‍हा दाखल करण्यात आला असून सोलापूरमधून विशाल प्रकाश सातपुते या तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी असे आवाहन केले आहे की कोणत्याही अफवेला बळी पडू नका कोणी अफवा पसरवली तर त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.


यावर अधिक वाचा :

31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप

national news
1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

इन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल

national news
1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...

एअर एशियाची दमदार ऑफर

national news
एअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

मुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त

national news
सोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...

फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया

national news
फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...

फेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...

national news
मार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर

national news
आयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...

आता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान

national news
‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...