testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

यंदा मराठी साहित्य संमेलन बडोदात

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि मराठी वाङ्मय परिषद (बडोदा) यांच्या संयुक्त विद्यमाने ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढील वर्षी १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत बडोदा येथे होणार आहे.
महाराज सयाजीराव गायकवाड विश्वविद्यालयाच्या परिसरात होणाऱ्या या संमेलनात महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे नवभारताच्या निर्मितीमधील योगदान, मराठी संतकवयित्रींची बंडखोरी आणि स्त्री वाद, अनुवाद-गरज, समस्या आणि उपाय, राजकीय वास्तवाच्या समर्थ चित्रणापासून लेखक दूर का या विषयांवर परिसंवाद, ‘नागर ते नांगर’ या विषयावर चर्चा, ‘कथा, कथाकार, कथानुभव’, ‘कविसंमेलन’, ‘प्रतिभावंताच्या सहवासात’, ‘संगीतकार श्रीनिवास खळे रजनी’, ‘बडोदा कलावैभव’ आदी कार्यक्रमही होणार आहेत.
त्याचप्रमाणे चार परिसंवाद, कवी संमेलन, कवितावाचन, कथानुभव, प्रतिभाच्या सहवासात, बहुभाषिक कवी संमेलन या वैशिष्टय़पूर्ण कार्यक्रमांसह मान्यवर लेखकांची मुलाखत, लेखकांचे सत्कार, शास्त्रीय गायन, कलावैभव दर्शन आदी कार्यक्रम होतील.
यावेळी
ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले जाणार असून त्यासाठीची नोंदणी २० डिसेंबर ते २० जानेवारी या कालावधीत महामंडळाच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील घटक संस्थांच्या कार्यालयात, समाविष्ट संस्था तसेच बडोदा येथील मराठी वाङ्मय परिषद या निमंत्रक संस्थेच्या कार्यालयात करता येणार आहे.


यावर अधिक वाचा :