testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बाळासाहेब ठाकरे यांचा ५ वा स्मृतिदिन

balasaheb thakare
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ५ वा स्मृतिदिन आहे. या निमित्तानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं शिवसैनिक त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मृती उद्यानावर येत
आहेत. शिवसैनिकांप्रमाणेच राजकारण, समाजकारण, उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवर बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येण्यात सुरुवात केली आहे.

बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या संकेत स्थळाचं लोकार्पण करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री शेतकरी सहाय्यता निधीला दोन कोटी रुपयांचा धनादेश मदत म्हणून सुपूर्द करतील. दुपारी १२ वाजता महापौर निवासात हा कार्यक्रम पार पडणार आहे.


यावर अधिक वाचा :