गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरु

राज्यात आज दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान  होत आहे.  राज्यभरात वेगाने होत असलेल्या राजकीय घडामोडींनंतर या निवडणूकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. थोड्याच वेळात इथे मतदानाला सुरूवात होणार आहे. 
 
ठाण्यात ४१, पालघर ५६, रायगड २४२, रत्नागिरी २२२, सिंधुदुर्ग ३२५, पुणे २२१, सोलापूर १९२, सातारा ३१९, सांगली ४५३,कोल्हापूर ४७८, नागपूर २३८, वर्धा ११२, चंद्रपूर ५२, भंडारा ३६२, गोंदिया ३५३ आणि गडचिरोली २६ अशा  एकू ३६९२ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होईल. तर १७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.