सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

जलयुक्त शिवारच्या कामात गैरव्यवहार झाल्याची सरकारचीच कबुली..

देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा गाजावाजा करत सुरू केलेली ‘जलयुक्त शिवार’ ही फसवी योजना असल्याचं आता उघड झालंय. जलयुक्त शिवारच्या कामात गैरव्यवहार झाल्याची कबुली आता सरकारनेच दिली आहे. बाळासाहेब चौधरी यांनी पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेत अनियमितता झाली असल्याची तक्रार केली होती. विधानपरिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासात या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला असतांना जलसंधारण विभागाने जलयुक्त शिवाराच्या कामांत अनियमितात झाल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या फसव्या योजनेने अखेर सरकारलाच तोंडघशी पाडले आहे. पावसाळी अधिवेशनात जलयुक्त शिवार योजनेवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.
 
दरम्यान राज्यात जलयुक्त शिवाराच्या कामात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणातील तत्कालीन कृषी आयुक्तांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातोय का? या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी दिरंगाई का केली जात आहे? असे प्रश्न उपस्थित करत गैरव्यवहारात सहभागी कर्मचाऱ्यांविरोधात एसीबी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  यांनी केली.