मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 जुलै 2022 (20:51 IST)

आमदार सदा सरवणकर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर

raj thackeray
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पायावर मोठी शस्त्रक्रिया झाली. यामुळे राज ठाकरे राज्यातील राजकीय घडामोडींपासून गेले काही दिवस प्रत्यक्ष अलिप्त होते. मात्र सोशल मीडियावर ते प्रत्येक घटनेवर आपल्या शैलीत व्यक्त होत राहिले. मात्र आता राज ठाकरे शस्त्रक्रियेनंतर काहीसे पुन्हा सक्रिय होताना दिसत आहेत. राज ठाकरेंच्या शस्त्रक्रियेनंतर शिवतीर्थावर त्यांना भेटीसाठी राजकीय नेत्यांची रिघ लागली आहे. एकनाथ शिंदे समर्थक आमदार सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत राज ठाकरे यांची विचारपूस करण्यास राज्यातील चालू घडामोडींवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. सदा सरवणकर हे त्या ठिकाणचे स्थानिक आमदार आहेत.