रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 ऑगस्ट 2017 (12:25 IST)

मुंबई विद्यापीठाचा ‘रखडलेला निकाल’ लवकर लावा

मुंबई प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी कुलगुरूंना निवेदन

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे यांची भेट घेऊन परीक्षा विभागाचा ‘रखडलेला निकाल’ या गंभीर विषयावर चर्चा केली आणि हे निकाल लवकर लागावेत अशा मागण्यांचे निवेदन त्यांच्याकडे सुपूर्त केले.

आपल्या ७०व्या स्वातंत्र दिनीही मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी रखडलेल्या निकालाच्या कैदेतून मुक्त झाले नाही. राज्यपाल व उच्चशिक्षणमंत्री ह्यांनी जाहीर केलेल्या वाढीव तारखा संपल्या असूनही निकाल अद्याप हाती आलेले नाहीत. लाखो विद्यार्थी हवालदिल आहेत. हेच विद्यार्थी आपल्या देशाचे भवितव्य घडवणार आहेत. मात्र त्यांचेच भवितव्य धोक्यात आले आहे. निकालाच्या विलंबास मुंबई विद्यापीठचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख जबाबदार आहेत.

विद्यार्थांना पुढील शिक्षणासाठी लागणाऱ्या दस्तावेजासाठी अक्षरश: परीक्षा भवनाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. टी.वाय.बीएसी तसेच ३१ जुलैला लागलेले इतर निकाल संपूर्णपणे जाहीर झालेलेच नाही. मुंबई विद्यापीठाने विद्यार्थाच्या देशांतर्गत आणि विदेशातील प्रवेशासाठी मदत करावी व त्यासाठी मदत कक्ष स्थापन करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. पुनर्मुल्यांकन आणि फोटो कॉपीसाठी वाढता विद्यार्थी टक्का लक्षात घेता ही सुविधा विद्यार्थांसाठी मोफत कराण्याचे या निवेदनात नमुद केले आहे. पाच दिवसात पुनर्मुल्यांकन आणि दोन दिवसात फोटोकॉपी देण्यात यावी जेणेकरून विद्यार्थांचे वर्ष वाया जाणार नाही आशीही मागणी केली.