मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 नोव्हेंबर 2021 (12:20 IST)

शिकाऊ डॉक्टरची हत्या, यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये खळबळ

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्याची रात्री हत्या झाल्याची बातमी आहे. मूळचा ठाणे जिल्ह्यातील असलेल्या आणि एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या अशोक पाल या विद्यार्थ्याची यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात हत्या करण्यात आली. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली असून हत्येचे नेमके कारण काय हे अद्याप अद्याप समजू शकलेले नाही.
 
या घटनेमुळे महाविद्यालयातील विद्यार्थी संतप्त झाले आणि आंदोलन सुरू केलं आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तपास सुरू केलाय. 
 
यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. अशोक पाल मागील काही दिवसांपासून शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करत होते. हत्या प्रकरणानंतर रुग्णालय परिसरात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. त्यांनी महाविद्यालय प्रशासन व डीनविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केलं असून राज्यत एकच खळबळ उडाली आहे.