1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 मार्च 2024 (12:38 IST)

मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलणार!

local train mumbai
मुंबईतील 8 रेल्वे स्थानकाच्या नावात बदल होणार असून शिवसेना खासदार आणि लोकसभा गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी या संदर्भात मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर होणार असल्याची माहिती राहुल शेवाळे यांनी दिली आहे. 

राज्य मंत्री मंडळाची आज होणाऱ्या बैठकीत ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येईल अशी शक्यता राहुल शेवाळे यांनी वर्तवली आहे. मागण्यांनुसार स्थानकांची नावे बदलण्यात येतील करीरोड स्टेशनचं नाव लालबाग, सॅण्डहर्स्ट रोड स्टेशनचं नाव डोंगरी, मरीनलाईन्स स्टेशनचं नाव मुंबादेवी, डॉकयार्ड स्टेशनचं नाव माझगाव स्टेशन, चर्नीरोड स्टेशनचं नाव गिरगाव, कॉटनग्रीन स्टेशनचं नाव काळाचौकी या नव्या नावांचा प्रस्ताव आहे. या पूर्वी रेल्वे स्थानकांची नावे ब्रिटिश कालीन शेवटचा निर्णय.हा निर्णय केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाचा असणार असे ते म्हणाले.
 
 Edited by - Priya Dixit