1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 जून 2017 (11:13 IST)

शेतकरी बंद जोरात सुरु मात्र अनुचित घटना नाही

नाशिक येथे झालेल्या शेतकरी बैठकीनंतर आज राज्य बंदची हाक दिली गेली होती.त्यानुसार पूर्ण नाशिक सह पूर्ण राज्यात बंदला मोठा प्रतिसाद मिळत असून नाशिक येथील १९ मुख्य बाजार समित्या आजही बंद आहेत. तर अनेक ठिकाणी रस्ता बंद आंदोलन शेतकरी करत आहेत.शेतकऱ्यांच्या महाराष्ट्र बंदला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केलाय. मुंबई बंद वगळून हा पाठिंबा असणार आहे. महाराष्ट्र बंदला शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा आहे.स्वाभीमानी शषतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी आज केवळ बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. लग्नाची तिथी असल्याने शेतकऱ्यांनी रास्ता रोको करू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे. महाराष्ट्र बंदला  सर्वत्र  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील असलेल्या  मनमाड,नांदगांव ,मालेगाव, कळवण, सटाना ,देवाळा  बाजार समिती व्यवहार ठप्प, येवला शहरात कडकडीत बंद ठेवला आहे. तर  धामणगाव येथे  शेतकऱ्यांकडून रस्त्यावर वांगे , कांदे , दूध फेकून सरकारचा निषेध केला आहे.नागपूर-तुळजापूर राज्यमार्गावर शेतकऱ्यांचा चक्काजाम, आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाला आहे. संगमनेरमधील कोल्हेवाडी शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, पुतळ्याला जोडे मारुन सरकारचा निषेध केला आहे.