गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 मे 2023 (21:57 IST)

नाशिक : शेतकऱ्याने कांद्याचा केला अंत्यसंस्कार (फोटो)

नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं मोठं नुकसान झालं आहे. अनेक शेतकऱ्याचा  शेतात काढून ठेवलेला कांदा पूर्णपणे  भिजून सडू लागला आहे.  बाजारात त्या कांद्याला कोणी बोली लावत नाही.  शेतकऱ्यांचा कांदा बाजारात नेण्याचा वाहतूक खर्चही निघत नाही. त्यामुळे नाशिकच्या सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील योगेश सोनवणे  शेतकऱ्याने शेतातल्या कांद्याचा अंत्यसंस्कार केला. सुमारे पंधरा एकर क्षेत्रातील नुकताच काढून ठेवलेला कांदा पावसाने भिजला. यामुळे संतप्त योगेश याने कांद्याचे अंत्यसंस्कार करीत अग्नीडाग देऊन विधिवत क्रियाकर्म केले.
 
 Edited By - Ratnadeep Ranshoor