शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

गडचिरोलीतल्या युवकांना आधार देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस

सुरजागड प्रकल्पात स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा, विद्यार्थ्यांची प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती मिळावी, विशेष जिल्हा म्हणून सरकारने उद्योगांसाठी सहकार्य करावे या मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते  पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. उर्वरित महाराष्ट्रापेक्षा या जिल्ह्यातील युवकांचे प्रश्न अधिक गंभीर आहेत. त्यामुळेच इथल्या युवकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार पाडेल, अशी ग्वाही संग्राम कोते पाटील यांनी मोर्चानंतर झालेल्या सभेत दिली.यावेळी जिल्हाध्यक्ष धर्मराव बाबा आत्राम, युवक जिल्हाध्यक्ष ऋषिकांत पापरकर,cयुवक संघटनेचे विदर्भ समन्वयक संग्राम गावंडे, माजी जि. प. भाग्यश्री हलगेकर, युवक उपाध्यक्ष रविकांत वर्पे उपस्थित होते.