'नाणार' नाहीच, शिवसेनेचा विरोध कायम

nanar prakalp
सिंधुदुर्ग| Last Modified सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (14:15 IST)
'नाणार' प्रकल्पासंबंधीची शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात आणि शिवसेनेची प्रकल्पविरोधी भूमिका या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. प्रकल्प नकोच अशी शिवसेनेची भूमिका आहे, असे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.
'सामना' या वृत्तपत्रात रिफायनरीची जाहिरात प्रसिद्ध झाल्याने प्रकल्प समर्थकांना एकप्रकारे बळ मिळाल्याचे बोलले जात होते. मात्र, सिंधुदुर्गचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जाहिरातीसंबंधी स्पष्टीकरण दिले आहे. वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली जाहिरात आणि शिवसेनेची प्रकल्पविरोधी भूमिका या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. प्रकल्प नकोच अशी शिवसेनेची भूमिका आहे, असे ते म्हणाले.
नाणार प्रकल्पाला शिवसेनेने तीव्र विरोध केला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोकण दौर्यावर असताना, त्यांनी रिफायनरी प्रकल्प होऊ शकतो, असे संकेत दिले होते. मात्र, निवडणुकीनंतर शिवसेनेच नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर नाणार प्रकल्प गुंडाळणार असे वातावरण तयार झाले होते. मात्र, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिकात प्रकल्पासंबंधी जाहिरात प्रसिद्ध झाल्याने प्रकल्प समर्थकांना पुन्हा बळ मिळाल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे भाजपचे नेते नीतेश राणे यांनी प्रकल्पाबाबत शिवसेना घेत असलेल्या भूमिकेची खिल्ली उडवली. तर माजी आमदार प्रमोद जठार यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.


यावर अधिक वाचा :

पुण्यातील काही भाग होणार सील

पुण्यातील काही भाग होणार सील
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी हे सील ...

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच
वारकरी पाईक संघाचे पत्रक

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा ...

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा कोव्हिड-19 नं घेतला बळी
महाराष्ट्रात सोमवारी 120 नवे रुग्ण आढळले तर 7 मरण पावले. या सात मृतांमध्ये एका 9 ...

जागतिक आरोग्य दिन......

जागतिक आरोग्य दिन......
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती. युनोचीही विशेष शाखा आहे. या ...

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स
ओप्पोचे कंपनीने Oppo A9 2020 स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केली आहे. ...

माहिती लपवल्याप्रकरणी १५० जणांवर गुन्हे दाखल

माहिती लपवल्याप्रकरणी १५० जणांवर गुन्हे दाखल
दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमाला गेलेल्यांकडून राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाची बाधा पोहोचली ...

भारत मदत करणार, हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील ...

भारत मदत करणार, हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी उठवणार
‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी न उठवल्यास प्रत्युत्तर देण्याचा इशारा ...

एमपीएससीच्या परीक्षा काही काळासाठी स्थगित

एमपीएससीच्या परीक्षा काही काळासाठी स्थगित
करोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा ...

उद्धव ठाकरे यांना तुमच्या सर्व निर्णयांना आमचा पाठिंबा : ...

उद्धव ठाकरे यांना तुमच्या सर्व निर्णयांना आमचा पाठिंबा : फडणवीस
करोनामुळे राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर विरोधी पक्षनेते आणि माजी ...

EMI टाळण्यासाठी फोन कॉल किंवा मेसेज आल्यास सावध राहा, ओटीपी ...

EMI टाळण्यासाठी फोन कॉल किंवा मेसेज आल्यास सावध राहा, ओटीपी शेअर करू नका
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे लॉकडाऊनची परिस्थितीला बघून रिझर्व्ह बँकेने बँकेच्या ...