गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 जानेवारी 2022 (14:01 IST)

शिवाजी चौक नाही ,तर छत्रपती शिवाजी चौकच म्हणायचं

आपल्या सर्वांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड आदर आहे. त्यांचे नाव नेहमी आदराने घेतले जाते.  त्यांचे नाव राज्यातील अनेक शहरात अनेक चौकांना दिले जाते. 
राज्यात सध्या राज्य शासनाने मंत्रांच्या बंगल्याला किल्ल्यांची नावे दिली असून  राज्यातील अनेक चौकाना छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नाव देण्यात आले आहे . औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर शहरात विविध चौकांना महापुरुषांची नावे दिली आहेत. ही नावे आंबेडकर चौक , शिवाजी महाराज चौक आणि महाराणा प्रताप चौक असे आहेत. गंगापूर नगरपालिकेने शहरात मोठे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत.या होर्डिंग्स मध्ये लासूर नाका नाही तर हिंदू सूर्य महाराणा  प्रताप चौक , आंबेडकर चौक नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असे म्हणायचे आणि शिवाजी चौक नाही तर छत्रपती शिवाजी चौक असे म्हणायचे . असे नागरिकांना आवाहन करत मोठे बॅनर लावण्यात आले आहे. हे बॅनर महापुरुषांचा सन्मान राखण्यासाठी आणि त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख होऊ नये या साठी लावण्यात आले आहेत. सध्या गंगापूर शहरात लावलेल्या या होर्डिंग्सची चर्चा होत आहे.