मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 डिसेंबर 2020 (09:06 IST)

पुन्हा एकदा रेल्वे प्रवासी संतप्त, पालघर आणि सफाळे रेल्वे स्थानकात ट्रेन रोखून धरल्या

अत्यावश्यक सेवेतील तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी असलेल्या रेल्वे गाड्या रेल्वेने अचानक बंद केल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. कामावर जाण्यास दुसरे साधन नसल्याने प्रवाशी संतप्त झाले आहेत. त्यामुळे त्यांनी बुधवारीपहाटेपासून पालघर आणि सफाळे रेल्वे स्थानकात ट्रेन रोखून धरल्या.
 
नोकरीसाठी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी ट्रेन रोखून धरली. त्यानंतर पालघर रेल्वे स्टेशन मास्टरने प्रवाशांच्या मागण्यांचे निवेदन घेऊन ते मुंबई सेंट्रलला पाठविण्याचे, तसेच तिथे जावून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर अडविण्यात आलेली लोकल मुंबईच्या दिशेने सोडण्यात आली.
 
दरम्यान, सफाळे रेल्वे स्थानकातील लोकल प्रवाशांनी सर्व ट्रेन पूर्ववत होईपर्यंत रोखून धरण्याल्याने पश्चिम रेल्वेवरील अप आणि डाऊन मार्गावरील सर्व गाड्या विविध रेल्वे स्थानकात अडकून पडल्या.