सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गडचिरोली , मंगळवार, 3 मे 2022 (15:08 IST)

गडचिरोलीत पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक, जवान जखमी

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात  आज सकाळी सी-60 पथकावर नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला चढवला.  यात एक जवान जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी हॅलिकॉप्टरने नागपूरला  हालविण्यात आले आहे.
 
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील दुर्गम भागात शोधमोहिम राबवली जात होती. यावेळी नक्षलवाद्यांनी अचानक सी-60 पथकावर हल्ला केला. पोलिसांनीही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, या चकमकीत एक जवान गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ हेलिकॉप्टरने उपचारासाठी नागपूरला हालविण्यात आले. पोलिसांच्या मदतीसाठी अतिरिक्त कुमकही बोलावण्यात आली होती. घटनास्थळी काही नक्षलींचा खात्मा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. घटनास्थळावरुन नक्षल्यांचे मोठय़ा प्रमाणात साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.