testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

शेतकर्‍यांपेक्षा जास्त पैसे मोदींनी नॅनोसाठी दिले: राहुल

rahul gandhi
गुजरात दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांपेक्षा जास्त पैसे टाटांच्या नॅनो प्रकल्पासाठी दिल्याचा आरोप त्यांनी केला. माध्यमांना मोदी सरकारविरोधात लिहायचंय पण त्यांना धमकावले जाते आणि मारहाण केली जाते, असा दावाही त्यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी अहमदाबादमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या गुजरात दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. मोदींच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींनी भाजपवर टीकास्त्र सोडले. मोदींनी शेतकऱ्यांपेक्षा दुप्पट पैसे टाटांच्या नॅनो प्रकल्पासाठी दिले, असे त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेसमधील पक्षांतर्गत नाराजीवर त्यांनी भाष्य केले. संघ आणि भाजपविरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांनाच आम्ही निवडणुकीत तिकीट देणार, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसमध्ये असूनही पक्षाच्या पराभवासाठी प्रयत्न केला तर त्यांना आमच्या पक्षात जागा नसेल, असा इशाराही त्यांनी पक्षविरोधी काम करणाऱ्यांना दिला.


यावर अधिक वाचा :