Widgets Magazine

राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा इशारा

rain
Last Modified मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017 (12:23 IST)

आगामी चार दिवस महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यात याचा मोठा परिणाम पाहायला मिळणार आहे.

चार दिवसांपूर्वीही हवामान खात्याने 5 ऑक्टोबरपासून 15 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. पण आता येत्या 4 दिवसातच हा पाऊस महाराष्ट्रात बरसण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली. हा पाऊस आणखी काही दिवस असाच बरसण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.यावर अधिक वाचा :