मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017 (16:48 IST)

राष्ट्रवादी काँग्रेस अंगणवाडी सेविकांच्या हक्कासाठी लढा देणार - चित्रा वाघ

Child wagh

आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्या आहेत. सेविकांना पोषण आहाराचे पैसे मिळत नाहीत, पगारही वेळेवर मिळत नाही. तरीही कुपोषणग्रस्त बालकांना आपल्या घरातील मुलं समजून प्रसंगी आपल्या घरातील अन्न सेविका खायला घालताना मी पाहिल्या आहेत. अंगणवाडी सेविकांचा राष्ट्रवादी काँग्रेसला सार्थ अभिमान आहे. वेतनवाढीची मागणी पूर्ण होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस सेविकांच्या सोबत लढा देणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. 

अंगणवाडी सेविकांच्या संपाचा आज २६ वा दिवस आहे. मुंबईतील आझाद मैदान येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून सेविका जमा झाल्या आहेत. चित्रा वाघ आणि आमदार विद्या चव्हाण यांनी आज आंदोलनस्थळी भेट देऊन सेविकांना पाठिंबा दिला. यावेळी त्या म्हणाल्या की संप होऊ नये म्हणून अंगणवाडीच्या संघटनांनी प्रयत्न केले होते. मात्र सरकारकडून एकदाही सकारात्मक भूमिका घेतली गेली नाही. म्हणून नाईलाजाने सेविकांना हा संप करावा लागत आहे. आपल्या मागण्या घेऊन जाणाऱ्या सेविकांना अधिकारी हकलून देत आहेत. इतकी मस्ती सरकारी यंत्रणेला आली आहे. यांची मस्ती उतरवण्यासाठी आपण सर्व मिळून संघर्ष करु, असंही त्या यावेळी म्हणाल्या.