testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जपान आपल्याकडे बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट करतंय - शरद पवार

sharad pawar
Last Updated: बुधवार, 4 ऑक्टोबर 2017 (16:16 IST)

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पक्षाचे अध्यक्ष शरद पवार

यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे घेण्यात आली. पक्षाची संघटनात्मक बांधणी तसेच भविष्याच्या वाटचालीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. पक्षांतर्गत लोकशाहीचा अवलंब करण्याच्या उद्देशाने नव्याने सुरू झालेल्या पक्षाच्या सभासद नोंदणी कार्यक्रमांतर्गत शरद पवार यांनीही नोंदणी केली व रू. ५५ फी भरली.

सामान्य माणसाच्या प्रवासातील यातना कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी बुलेट ट्रेनचे प्रोजेक्ट आणले जात आहेत. या ट्रेनची कारखानदारी जपानमध्ये आहे पण त्याला मार्केट नाही. जपान त्यांची आर्थिक मंदी कमी करण्यासाठी आपल्याकडे बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट करतंय, असा आरोप पवार यांनी यावेळी केला. ६ व ७ नोव्हेंबरला कर्जत येथे पक्षाच्या कार्यकारिणी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

प्रत्येक सेल आपापल्या क्षमतेनुसार कामही करत आहेच पण पुढच्या काळात राष्ट्रवादी बुथ लेवलवरही लक्ष देईल, असे प्रदेशाध्यक्ष
सुनील तटकरे

यांनी येथे स्पष्ट केले. नवीन सभासद नोंदणीची कार्यक्रम विद्यार्थी, युवक, युवती, महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हाती घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. पदाधिकाऱ्यांनी व्यापक व आक्रमकपणे आंदोलन करावे. पक्षासाठी अधिक जोमाने काम करण्याची गरज आहे. एकाच टप्प्यात लोकसभा व विधानसभा निवडणुका होतील असा अंदाज आहे. त्यामुळे आपण आताच कंबर कसायला हवी, असे आवाहन पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते
अजित पवार

यांनी केले. केंद्र व राज्य सरकारविरोधात जनतेत एक जनमत तयार होत आहे. नोटाबंदी, जीएसटी आणि विविध गोष्टींबाबत जनतेमध्ये नाराजी आहे. विधिमंडळात मंत्र्यांचे घोटाळे बाहेर आले तेव्हा सत्तेतील लोकांनी पळ काढला, हे राज्यात पहिल्यांदाच घडलं. सरकार विरोधात जनमत तयार करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सिंहाचा वाटा आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच विजय होईल, अशी घोषणा करून विधान परिषद विरोधी पक्षनेते
धनंजय मुंडे

यांनी उपस्थितांना प्रोत्साहन दिले.यावर अधिक वाचा :